/सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन

सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन

 सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन 

सर्व माजी विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, या महाविद्यालयाची जडण-घडण होण्यामध्ये आपले मोलाचे योगदान आहे. आपण या महाविद्यालयात शिकून समाजामध्ये विविध स्तरावर उत्कृष्ट कार्य करत आहात. आज आपल्यासारख्या माजी विद्यार्थ्यांचे पाल्य देखील याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. हे महाविद्यालय राष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद  २६ मे रोजी *नॅक कमिटी* *पुनर्मूल्यांकन* करण्यासाठी महाविद्यालयास भेट देणार आहेत. माजी विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालया विषयी संवाद साधणार आहेत. यावेळी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे. या बरोबरच मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार या नॅक कमिटीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. १६ मे २०२२ रोजी सांय. ०५ ते ५:३० या वेळेत भेट देणार आहेत. सदरच्या दिवशी देखील आपण महाविद्यालयात उपस्थित रहावे. वरील नमूद तारखांमध्ये केवळ अर्धा तास आपणाला महाविद्यालयाच्या भरभराटीसाठी द्यावा लागणार आहे. सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती…!

प्राचार्य 
डॉ.विजय मेधणे
श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया कला,
विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय.
देवळाली कॅम्प. नाशिक.